जळगाव : जळगावात होणाऱ्या अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच जळगावातील एमआयडीसी परिसरात क्रेनने मागून जोरदार धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली येवून महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी घडली. घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी रंजना उत्तम येशे (वय ५३) या महिलेचे यामध्ये मयत झाले आहे. त्यांचा मुलगा विकास हा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉंड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पाय जात होत्या.
हे पण वाचा..
चिंता वाढवणारी बातमी! नव्या व्हायरमुळे हाहाकार, 24 तासांच्या आत संक्रमित व्यक्तीचा होतो मृत्यू
धक्कादायक! 64 वर्षीय वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, video कॉल केला अन्…
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मोठी भरती जाहीर ; 60 हजारापर्यंत मिळेल पगार
सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मागून येणारा क्रेन क्रमांक (एमएच ४० पी २३०९ ) ने जोरदार धडक दिली. क्रेनने धडक दिल्यानंतर त्या जमीनवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेतली होती. तर क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विशाल मेडिकलचे संचालक छोटू जाधव यांच्या भगिनी होत.