पुणे : सध्या सेक्सॉर्टशनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशात पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील 64 वर्षीय वृद्धाला सेक्सटॉर्शनने जाळ्यात ओडून ४ लाखांची फसवणूक केली.
नेमकी काय आहे घटना?
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका ६४ वर्षीय आजोबांना व्हिडिओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा कॉल व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. २१ ते २५ मार्च दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीतील गोखलेनगरमधील एका ६४ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना एका तरुणीने त्यांना व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉल केला. त्यांच्याशी चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केले. तसेच त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. हा संपूर्ण कॉल सुरू असतानाच त्याचे स्क्रिन रेकॉर्डिंग करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
हे पण वाचा..
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मोठी भरती जाहीर ; 60 हजारापर्यंत मिळेल पगार
आपले लग्न होणार नाही भीतीने मुक्ताईनगरमधील प्रेमी युगलाने उचललं टोकाचं पाऊल
पहूर – शेंदुर्णी दरम्यान विदयार्थ्यांना घेऊन जातं असलेली स्कूल बस उलटली
जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण
यावेळी आणखी एका आरोपीकडून पोलिस असल्याचे सांगत धमकावण्यात आले. तसेच हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ४ लाख ६६ हजारांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पुण्याच्या चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.