चाळीसगाव : अशीच कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. त्यातही जळगावमध्ये व्यापाऱ्यांकडून कापूस मोजताना काटा मारला जात असून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. असाच फसवणुकीचा प्रकार चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला आहे.
चाळीसगाव परिसरात ही घटना घडली आहे. येथील मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला 40 क्विंटल कापूस वेचणीच्या वेळी मोजून घरात ठेवला होता. गावात आलेल्या धुळे जिल्ह्यातील मूकटी येथील व्यापाऱ्याने तो कापूस 7800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केला. मात्र वजन केल्याच्यावेळी 40 क्विंटल कापसाचे केवळ 30 क्विंटलच वजन आले. सबंधित व्यापाऱ्याने मोजलेल्या मालाची रक्कम देखील शेतकऱ्याला तात्काळ दिली.
मात्र जवळपास 10 क्विंटल घट आल्याने शेतकरी मुन्ना चव्हाण यांनी आपल्या गावातील सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला. तसेच झालेल्या प्रकाराची माहिती मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. त्यांनतर आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी हा तिथून फरार झाला होता.
हे पण वाचा
जळगावात तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं काय आहे कारण?
गौतमीच्या गाण्यासाठी तीन लाख अन् आम्ही पाच हजार जास्त मागितले तर..; इंदुरीकर महाराज गरजले
२५ वर्षीय अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या ; पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !
आमदार मंगेश चव्हाण यांनी 40 किलोच्या मागे 10 ते 12 किलो कापूस म्हणजे एका क्विंटलमागे 30 ते 35 किलो जास्त कापूस मोजला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदारांनी सदर शेतकऱ्यांसोबत तो मोजलेला कापूस, गाडी असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्याचे सांगितले.