जळगाव: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार आता जळगावात समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पाथरी येथे ११ वर्षांचा मुलाचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी दीड वर्षांनी बालकाच्या आईच्या फिर्यादीवरुन पाथरी गावातीलच तिन्ही डॉक्टरांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश नाना पाथरवट असे मयत बालकाचे नाव आहे.
नेमकं काय हे प्रकरण?
धरणगाव तालुक्यातील वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉ. स्वप्निल युवराज पाटील यांच्या दवाखान्यात नेले होते. त्यांनी तपासून दुर्वेश यास कमरेवर एक इंजेक्शन व काही गोळ्या लिहून दिल्या होत्या. यानंतर तीन दिवसांनी १३ ऑक्टोबरला पुन्हा दुर्वेश यास ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला डॉ. स्वप्निल पाटील यांच्या दवाखान्यात नेले. याठिकाणी डॉ स्वप्निल पाटील नव्हते, तर डॉ. युवराज जयराम पाटील यांनी दुर्वेश या तपासून दुर्वेश यांच्या दोन्ही कमरेवर इंजेक्शन व गोळ्या लिहून दिल्या होत्या.
१४ ऑक्टोबरला दुर्वेशच्या कमरेवर इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी त्रास व्हायला लागल्याने कुटुंबियांनी दुर्वेश यास गावातील डॉ सुभाष जाधव यांच्याकडे नेले. त्यांनी दुर्वेशला त्याच्या कमरेवर व हाताच्या दंडावर इंजेक्शन दिले व काही गोळ्या लिहून दिल्या. दुर्वेशला कमरेवर इंजेक्शन घेतल्याच्या ठिकाणी त्रास होत असल्याने दुर्वेशच्या मामाने डॉ. युवराज पाटील यांना फोनवरुन सांगितले. यानंतर डॉक्टर युवराज पाटील घरी आले. त्यांनी दुर्वेशला तपासले तसेच दवाखान्यात घेऊन या. डॉक्टर स्वप्नील पाटील हे तपासून नेमकं काय झालं ते सांगतील असं युवराज पाटील यांनी दुर्वेशच्या कुटुंबियांना सांगितलं.
हे पण वाचा
गौतमीच्या गाण्यासाठी तीन लाख अन् आम्ही पाच हजार जास्त मागितले तर..; इंदुरीकर महाराज गरजले
२५ वर्षीय अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या ; पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू
Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !
दुर्वेशला दवाखान्यात नेले असता, डॉ स्वप्निल पाटील यांनी दुर्वेश यास तपासून इंजेक्शन दिल्याच्या ठिकाणी सेप्टिक झाले असावे असे सांगत त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील पियुश हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि त्याबाबत चिठ्ठी बनवून देतो असे सांगितले. डॉ स्वप्निल पाटील यांच्या सांगण्यानुसार कुटुंबियांनी १५ ऑक्टोंबर रोजी दुर्वेश यास उपचारासाठी जळगावात पियुश हॉस्पिटल येथे नेले. याठिकाणच्या डॉक्टरांनी दुर्वेश यास तपासले व सोनोग्राफी करण्यास सांगितले.