इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गोला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आज सकाळी यूके-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेड (OneWeb) चे 36 उपग्रह घेऊन जाणारे LVM3 रॉकेट प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोच्या या कामगिरीमुळे आता जगाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे.
LVM3 हे सर्वात मोठे रॉकेट आहे
SDSC-SHAR च्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण करण्यापूर्वी, रॉकेट आणि उपग्रह यंत्रणा तपासण्यात आली आणि त्याच वेळी, रॉकेटसाठी इंधन देखील भरले गेले. हे रॉकेट 43.5 मीटर लांब आणि 643 टन वजनाचे आहे. त्याच वेळी, 36 जनरल 1 उपग्रहांचे वजन 5,805 किलो आहे. असे सांगण्यात येत आहे की हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) ठेवले जातील.
इस्रोच्या हेवी-लिफ्ट रॉकेटमध्ये 10 टन एएलईओ आणि चार टन जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (जीटीओ) वाहून नेण्याची क्षमता आहे. आगामी रॉकेट मोहिमेला इस्रोच्या LVM3-M3/OneWeb India-2 मिशनचे कोड असे नाव आहे.
#WATCH | Andhra Pradesh: The Indian Space Research Organisation (ISRO) launches India’s largest LVM3 rocket carrying 36 satellites from Sriharikota
(Source: ISRO) pic.twitter.com/jBC5bVvmTy
— ANI (@ANI) March 26, 2023
वनवेबसाठी दुसऱ्यांदा लॉन्चिग
याआधी इस्त्रोकडून वनवेबसाठी पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान या मोहिमेविषयी माहिती देताना इस्रोने एक नोटिफिकेशन जारी करून म्हटले की LVM-M3/OneWeb India-2 मिशनसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोसाठी ही 2023 मधील हे दुसरी मोहिम आहे.
OneWeb ने एका निवेदनात सांगितले की, 18 वे लॉन्चिंग पूर्ण झाले आहे. आणखी 36 उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलेल्या त्यांच्या उपग्रहांची संख्या 616 पर्यंत वाढली आहे. यामुळे या वर्षी जागतिक सेवा सुरू करण्यासाठी हे पुरेसे आहे.