नवी दिल्ली : जर तुम्ही देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी Hero Motocorp ची बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत बुकिंग करावे लागेल. कारण कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, Hero MotoCorp ने 1 एप्रिल 2023 पासून त्यांच्या काही निवडक मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तथापि, कंपनीने कोणत्या बाइक/स्कूटरच्या किमती वाढवणार आहेत याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
हिरो मोटोकॉर्प किंमत का वाढवत आहे?
भारतात 1 एप्रिल 2023 पासून नवीन BS6 फेज-2 आणि RDE इंधन नियम अनिवार्य केले जातील. यामध्ये ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD)-2 मानदंड आवश्यक असतील. या नियमानुसार ऑटो कंपन्या आपले मॉडेल अपडेट करत आहेत. Hero MotoCorp ने एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की कंपनी OBD2 मुळे खर्च वाढल्यामुळे किंमत वाढवत आहे.
RDE म्हणजे रिअल टाइम ड्राइव्ह उत्सर्जन. इंधनाची पातळी निर्धारित मर्यादेच्या पलीकडे पोहोचल्यावर वाहनचालकांना रिअल टाइम माहिती मिळणार आहे. यामध्ये वाहनांसोबत एक उपकरण बसवले जात आहे जे वाहनांमधील इंधन जाळण्यावर लक्ष ठेवेल आणि चालक-स्वारांना थेट माहिती देईल.
हे पण वाचा
लयभारी: सरकारच्या ‘या’ योजनेत दररोज करा फक्त 7 रुपयाची बचत अन् मिळवा 60 हजार रुपये पेन्शन
मोठा दिलासा! LPG सिलिंडरवर सबसिडीची घोषणा, तुम्हाला मिळणार का लाभ?
शेतकऱ्यांना मिळताय ‘या’ योजनेत २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे अनुदान
कंपनी सुलभ वित्त सुविधा प्रदान करेल
Hero MotoCorp ने म्हटले आहे की ग्राहकांना वाढीव किमतीचा फारच कमी भार सहन करावा लागतो, त्यामुळेच कंपनी सुलभ फायनान्स सुविधा देत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागात कंपनीच्या वाहनांची मागणी वाढली आहे. येत्या सणासुदीच्या काळात वाहनांची मागणी आणखी वाढणार आहे.