जळगाव,(प्रतिनिधी) –एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे आज दि.२५ मार्च २०२३ रोजी पदवी प्रदान कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक एल .एच.पाटील उपस्थित होते. त्याच बरोबर चेअरमन जितेंद्र पाटील , विरेंद्र पाटील, शाळेचे संचालक कुणाल राजपूत, सौ.दिव्यांनी राजपूत उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या शिल्पा मलारा यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थीनी पदवी सभारंभ साठी काळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान केली होती. त्याच बरोबर के.जी. च्या मुलांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिक्षिका सेजल शेख, व कोमल मिस यांनी केले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिकक्षेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.