Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 24 मार्चपासून महोत्सवाचे आयोजन ; नागरीकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
March 21, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, जळगावमार्फत बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे 24 ते 26 मार्च, 2023 दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत यशोदाई हॉल, रिंग रोड, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलयामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

          या प्रदर्शनाचे उद्घाटन 24 मार्च, 2023 रोजी दु. 3.00 वा. खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया असतील. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक (आत्मा) कुर्बान तडवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ वनिता सोनगत, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मनोहर चौधरी, संदीप मराठे, विभागीय संसाधन व्यक्ती, माविम, नाशिक विभाग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

          नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिलांमध्ये विक्री कौशल्य विकसित व्हावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रदर्शनात बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी असतील तसेच त्यामध्ये PMFME अंतर्गत व इतर योजनांमधील गटांना स्टॉल देण्यात येणार आहे. प्रदर्शनात खान्देशी मसाले, विविध प्रकारचे तांदूळ पापड, नागली पापड, बिबड्या, कुरड्या, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, गारमेंट, हस्तकला वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर तृणधान्याचे महत्व सर्वसामान्यांना कळावे यासाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणीयुक्त पदार्थ, राजगिरा यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे. प्रदर्शनात आरोग्य विषयक माहिती सुद्धा देण्यात येणार असून सांस्कृतिक व जाणीव जागृतीचे कार्यक्रम होणार आहे.

          तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून बचत गटामार्फत निर्मित शुद्ध व दर्जेदार उत्पादन खरेदीचा आनंद घ्यावा. असे आवाहन व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यलय, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे अवाहन ; आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा…

Next Post

भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा मंत्री उदय सामंत यांची माहिती

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post

भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबतचा मंत्री उदय सामंत यांची माहिती

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us