जळगाव : सध्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी सुरू केली असून मात्र हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या मते, पुढच्या दोन दिवसांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.या महिन्यात आतापर्यंत दुसऱ्यांना शेतकऱ्यांना अवकाळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना इशारा
नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा…
जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केलं विधानभवनात मोठं भाष्य
अबब..! महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो तब्बल ‘एवढा’ पगार अन् भत्ते ; माहिती अधिकारातून आकडा समोर
गोणपाटात महिलेच्या मृतदेहाचा हाडाचा सांगाडा आढळला, चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
मध्य महाराष्ट्र आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दिवशी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ मार्च रोजी जळगाव, अहमदनगर,पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
तर १८ मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.