अमरावती : राज्यात महिलांवरील अत्याचार काही कमी होण्याचं नाव नाही. त्यातच अमरावती जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत एक भयंकर प्रकार घडला आहे. आजीकडे पाहुणी म्हणून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ जणांविरोधात बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात असून यात दोन महिलांचादेखील समावेश आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीच्या गावी आली होती. यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधून दोन महिलांनी तिला बळजबरीने दारू पाजली. इतक्यावरच या महिला थांबल्या नाहीत. तर त्यांनी दोन नराधमांना घरात बोलावले. त्यानंतर दरवाजा बाहेरून लावून त्या घराबाहेर निघून गेल्या.
हे पण वाचाच..
मुलीच्या भविष्याची चिंता सोडा..! फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार पूर्ण 65 लाख
चिंता वाढली ! कोरोनाचं नवं संकट महाराष्ट्रात धडकलं, या जिल्ह्यात आढळले 22 रुग्ण
राज्यात आजपासून पुढील चार दिवस अवकाळीचे ; तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून
खुशखबर..! पोस्ट ऑफिस ‘या’ योजनेत होतील पैसे दुप्पट ; सरकारने वाढवले व्याज
याच गोष्टीचा फायदा घेत नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. यातून कशीबशी सुटका करून तिने शिरजगाव कसबा पोलिसांत (Police) तक्रार दिली. या प्रकरणी बाल लैंगिक कायद्या अंतर्गत आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला. तर ४ आरोपींना अटक केली आहे. सद्या न्यायालयाने २ नराधमांस दोन दिवसीय पीसीआर तर दोन महिलांना एमसीआर दिला आहे.