शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खेड येथे आज रविवार दिनांक ५ रोजी ‘शिवगर्जना‘ मेळावा झाला. या खेडमधील अतिविराट सभेत उद्धव ठाकरे यांनी मिंध्यावर आणि भाजपवर चांगलेच गरजले असून निवडणुक आयोगाला देखील चुना लगाव आयोग म्हणून उल्लेख केला.माझ्या वडिलांचा फोटो त्यांनी चोरला, अमित शहा आपल्या वडिलांसारखे आहे, असे ते म्हणाले, हा राजकीय वांझोटेपणा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मद्दे वाचा…
• आता आपण देशासाठी उभे राहिलो नाही, तर 2024 या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील आपला देश पुन्हा गुलामगिरीत जाणार नाही, यासाठी प्रतिज्ञा करा
•खंडोजी खोपडे होणार का कोन्होजी जेधे हे ठरवा
• जनता जो निर्णय करेल, तो आपल्याला मान्य असेल. • चोरलेला धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो.
• शिवसेना आणि बाळासाहेबांच्या नावाशिवाय मोदी यांच्या नावावर मत मागून दाखवा, असे थेट आव्हान आहे.
• माझ्या वडिलांचा फोटो त्यांनी चोरला, अमित शहा आपल्या वडिलांसारखे आहे, असे ते म्हणाले, हा राजकीय वांझोटेपणा आहे.
• क्रांतीकारकांनी रक्त शिंपडून तुमची गुलामगिरी करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेले नाही.
ज्यांचे राजकीय वय 10-15 वर्षे आहे, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
आणि त्यांचे विचार आपल्याला सांगत आहेत. • पक्षाचे नाव आणि चिन्ह याशिवायही आम्ही विजय मिळवला आहे.
• शिवसेना नाव बाजूला ठेवा, तुमच्या आईवडिलांचे नाव घेत पक्ष बांधून दाखवा
• तोफा या देशद्रोह्याविरोधात वापरल्या जातात, ढेकणांना चिरण्यासाठी बोटच पुरेसे आहे.
• ही ढेकणे आपले रिक्त पिऊन फुगलेली आहे, त्यांना चिरडण्यासाठी तुमचे एक बोट पुरेसे आहे.
• आम्ही शिवसेनाच म्हणणार, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही.
• आता संजय कदम आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहे.
• ते मराठी आणि हिंदू एकतेवर घाव घालत आहे. शिवसेनाप्रमुखांमुळेच ते या पदावर आहेत.
• शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न करत आहात, त्यांना ते काय करत आहेत ते समजत नाही.
• खरी शिवसेना कोणती हे बघायला त्यांनी यावे
निवडणूक आयोग नसून तो चुना लगाव आयोग आहे.
धुनष्यबाण त्यांनी चोरला असेल पण तो त्यांना पेलवेल का
• गद्दारांना वाटत असेल ते शिवसेना चेरू शकतात, ते नाव त्यांनी चोरले आहे, पण शिवसेना त्यांना चोरता येणार नाही
तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत.
• आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, तरी तुम्ही सोबत आला आहात
शिवसेनाप्रमुख म्हणायचे तसे तुमच्यात मला आई जगदंबेचे दर्शन होत आहे.
• धनुष्यबाण चोरण्याचा प्रयत्न करा, मात्र तुमच्या माथ्यावर गद्दार हा शिक्का आहे, तो पुसला जाणार नाही
• निवडणूक आयोगाने यात चोमडेपणा करण्याची गरज नाही.
• या शिवसेनेचा प्रमुख तुम्हाला मिंधे हवे आहेत का, याचा निर्णय घेईल
हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख एकमेव आहे. संपूर्ण देश नासवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यांना भगवे तेज संपवायचे आहे.
• निवडणुकीत तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, नंतर त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी मागे मागे फिरतात
• घराणेशाही आणि वंशवादाचा आरोप करता आमची सहावी पिढी राज्यासाठी राबते आहे.
• सध्या खंडोजी खोपडे कोण आमि कान्होजी जेधे कोण हे ओळखण्याची वेळ आली आहे.
• जोपर्यंत आपला शोवटचा श्वास आहे, तोपर्यंत स्वराज्याशी द्रोह करणार नाही, असे जेधे म्हणाले होते.
खंडोजी खोपडे त्यावेळी अफजल खानाला सामील झाले होते, त्यावेळी कान्होजी जेधे कोण हे समजते.
आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे आता त्यांच्या सभेत संधीसाधू दिसतात.
• विरोधी पक्षात असलेले पापी, भ्रष्टाचारी आणि त्यांच्याकडे गेल्यावर ते शुद्ध होतात. • विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. जनतेच्या
मनातील प्रश्नच आम्ही विचारले आहेत. • दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आपल्याला भेटायला आले होते, तेव्हा
त्यांनीही एकजुटीची गरज व्यक्त केली
मुंबईला वाचवणारे शिवसैनिक त्यांना देशद्रोही वाटतात • आम्ही देशप्रेमी आहोत, देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू
• राजन साळवी यांच्या घराचे मोजमाप केले, ते काय देशद्रोही आहे
वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून त्या तारा भूमिगत करण्याचे काम सुरू केले.
• वादळासारख्या नैसर्गिक संकटात सर्व निकष बाजूला ठेवत आपण कोकणला मदत केली.
• रेवस रेड्डी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम आपण सुरु केले • जो सारखे कुटुंब बदलतो, तो कुटुंबांची जबाबदारी कशी घेणार
महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे.
• दिल्लीसमोरही ते शेपटी घात आहेत. राज्याला झुकवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे विचार नव्हते.
• आता कर्नाटक महाराष्ट्राविरोधी बोलत आहेत आणि ते शेपटी घालून बसले आहेत.

