जळगाव : जळगावात एका विचित्र प्रकारामुळे आठ वर्षांच्या चिमुरडीचा करुण अंत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बालिकेला झोपेत उलटी (वांती) झाली. ती उलटी घशात अडकल्याने त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. अनुष्का मुकेश जावरे असे या मृत चिमुकलीचे नाव असून एकुलत्या एक मुलीच्या अचानकच्या अशा जाण्याने अनुष्काच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
काय आहे प्रकार
जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे यांची आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का महापालिकेची शाळा क्रमांक तीनमध्ये सीनिअर केजी या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी अनुष्का सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली. मात्र घरी आल्यावर अनुष्काला बरं वाटत नव्हते. तिला ताप असावा, म्हणून अनुष्काची आई अलका यांनी तिला झोपविण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा..
पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट ; भाजप-कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO व्हायरल
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात नोकरीची संधी.. लाखोत पगार मिळेल
व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणीनं धावत्या ट्रेनमधून डोकं बाहेर काढलं, अन्.. Video पाहून अंगावर काटे येतील
पदवी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 577 जागांसाठी भरती
झोपेत उलटी झाली अन्
याचदरम्यान अनुष्काला दोनवेळा उलटी झाली. गुळण्या करून पाणी पिल्यावर अलका यांनी अनुष्काला झोपविले. मात्र, पुन्हा अनुष्काला त्रास होऊ लागला. झोपलेली असतानाच अनुष्काला उलटी झाली. ही उलटी घशात अडकली. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला व त्यातच ती बेशुद्ध पडली. काही वेळातच अनुष्काची प्रकृती खालावल्याने आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत अनुष्काचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.