दृष्टी कमी असताना चष्मा न लावता अनेकजण कॉन्टॅक्ट लेन्स घालणे पसंत करतात. त्यात बरेच लोक आहेत जे कधीकधी कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपतात. तुम्हीही असे केले तर लगेच सुधारणा करा कारण अमेरिकेतील एका तरुणाला लेन्स लावून झोपणे चांगलेच भोवले आहे.
द मिरर यूकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या माईकला झोपेतून उठल्यावर डोळ्यात संसर्ग झाल्याचे जाणवले. तो आपल्या कामाच्या ठिकाणी दुपारी थोडावेळ झोपला होता आणि उठल्यावर डोळ्यांना इजा झाल्याचे जाणवले. डॉक्टरांनी माईकच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्याचे सांगितले अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. माईकने सांगितले की, त्याला अनेकदा डोळ्यात इन्फेक्शन होत असे.
हे पण वाचा..
नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, मग भडकलेल्या पत्नीने काय केलं वाचा…
नोकरदारांसाठी होळीपूर्वी आली मोठी बातमी ; पगार ४४ टक्क्यांनी वाढणार
चार वर्षाच्या चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव ; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
लेन्स लावल्यामुळे असे घडते, पण माईक त्याकडे दुर्लक्ष करायचा. माईकच्या या चुकीमुळे तो एका डोळ्याने आंधळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माईकच्या डोळ्यात बॅक्टेरिया विकसित झाला होता, ज्याला अकांथामोबा केरायटिस म्हणतात. यामुळे डोळ्याच्या ऊतींचा नाश होतो आणि दृष्टी जाते. माईकच्या बाबतीत याच बॅक्टेरियाने घात केला आणि माईकची दृष्यी हिरावली.