Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होय आम्ही शिकणार… संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार

najarkaid live by najarkaid live
February 20, 2023
in जळगाव
0
होय आम्ही शिकणार… संघर्ष करणार – चाळीसगाव येथील ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार
ADVERTISEMENT
Spread the love

चाळीसगाव : माणसाने कोणाच्या घरात जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते. परंतू आपल्या कर्तुत्वाच्या बळावर उंच शिखर गाठत आकाश भरारी घेण हे नक्की त्याच्या हातात असते. अनेकदा उंच भरारीसाठी कोणाची तरी भक्कम साथ हवी असते. आणि हिच साथ या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून तुम्हा सर्वांना देत आहे. मिळालेल्या या प्रोत्साहनातून भरारी घेत परिस्थितीवर मात करा. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना म्हटले जाते त्यांच्या कार्याला कृतीतून आदरांजली देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व शिक्षण व सहकार महर्षी स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या पूण्यतिथी निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालूक्यातील आर्थिकदुष्टया दुर्बल कूटूंबातील प्रतिभावान विदयार्थ्यांसाठी स्व. रामराव जिभाऊ पाटील विदयार्थी सन्मान शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते.

चाळीसगाव शहरातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला व्यासपिठावर तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिक्षक एम. राजकूमार, मुख्यकार्यकारी अधिकारी. जि.प, जळगाव डॉ. पंकज आशीया, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंह देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपस्थित होते तर चाळीसगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण संस्था संचालक, आजी माजी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार चव्हाण पूढे म्हणाने की, ४२५ विदयार्थ्याना हि शिष्यवृत्ती देण्यात आली. यातील ४५ विदयार्थी हे पालकत्व नसलेले आहेत. सरासरी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे तसेच शैक्षणिक कर्ज, वस्तीगृह मिळवून देण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे. निवड समितीने पारदर्शकपणे आर्थिकदुष्टया दुर्बळ व प्रतिभावंत विदर्यार्थ्यांची निवड केली आहे. हि शिष्यवृत्ती अल्पशी असली तरी शिक्षणासाठी गरज भासल्यास निवड समिती नक्कीच अधिक मदतीची शिफारस करेल असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

जळगाव जिल्हाचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कूठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. आम्ही सर्व अधिकारी हे तुमच्या सारख्याच सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहोत. आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास ठेवून मेहनत करा. प्रत्येकाने परिस्थितीचा बाऊ न करता चांगल्या दर्जाच शिक्षण घ्यायला हवे. शासनाच्या योजना कमी अधिक प्रमाणात कामात येतातच मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या सारखा लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी असल्याने तुम्ही फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही असे ते म्हणाले तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशीया यांनी क्षेत्र कूठलेही असो, आपल्यातील वेगळेपण त्याठिकाणी दाखवावे, शिक्षणाबरोबरच विविध गुण अंगिकारले पाहिजे. येणाऱ्या काळात बहूआयामी लोकांची देशाला गरज आहे असे त्यांनी विदर्यार्थ्यांना संबोधित केले.

…………………….
अन अश्रुंचा फुटला बांध…
आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली व त्यातुन त्याला प्रोत्साहन मिळत तोही मोठा अधिकारी होईल असे म्हणत मंगेश दादा चव्हाण हे भावाप्रमाणे त्याच्या पाठिमागे उभे राहिले असे म्हणत एका आईने आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरुपात ज्या १० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली त्या विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ध्वनिचित्रफिती बनविण्यात आल्या होत्या. तसेच रामराव जिभाऊ पाटील यांच्या जीव कार्याची ओळख करून देणारी डॉक्युमेंटरी देखील यावेळी दाखविण्यात आली. लेखक कवी जिजाबराव वाघ यांनी शब्दबद्ध केलेल्या या ध्वनिचित्रफिती पाहून उपस्थित देखील भारावले.
—————————–
शिष्यवृत्ती योजनेला स्व.जिभाऊ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल रामराव जिभाऊ पाटील यांच्या परिवारातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे कुमारी धनश्री कावडे हिला लॅपटॉप भेट देण्यात आला, तीला उच्च शिक्षणासाठी कर्ज मंजूर करून देणारे कॅनरा बँकेचे व्यवस्थापक श्री.प्रदीप डोंगरे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रा.तुषार चव्हाण सर यांनी शिष्यवृत्ती साठी समिती नेमण्यापासून ते विद्यार्थी निवड यापर्यंतची सर्व प्रक्रिया समजावून सांगत योजने मागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता गवळी, एकनाथ गोफणे सर यांनी केले तर आभार प्रा.रविंद्र पाटील यांनी मानले.
…………………………………..
या शिष्यवृत्ती मुळे खूप प्रेरणा मिळाली आहे. चांगला अभ्यास केल्यास समाज देखील पाठीशी उभा राहतो. आता परिस्थितीची चिंता नाही. लढण्याची उर्मी निर्माण झाली आहे. काही अडचण आल्यास मंगेश दादा आहे पाठिशी
आशुतोष पाटील ( विद्यार्थी)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवजयंती निमित्त मालदाभाडी गावात स्वच्छता मोहीम ; विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या, या गोष्टी टाळा ; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या, या गोष्टी टाळा ; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us