जळगाव : राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली आले आहे. यंदाच्या तापमानातील हा निच्चांक आहे.या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे.
हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये तीन ते चार दिवस पारा १० अंशापेक्षा कमी झाला. परंतु, तर डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कधी थंडी तर कधी गरमी जाणवत होती. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ही थंडी कायम आहे.
हे पण वाचा..
जगासमोर नवं संकट ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरसची एन्ट्री, जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक
वर्गातच प्रोपज करायला गेला, पुढे मुलीने काय केलं पहा व्हिडीओ
बँकेपासून पोस्ट ऑफिसपर्यंत कुठे जास्त व्याज मिळतंय, इथे जाणून घ्या
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज; सातवा वेतन आयोग लागू होणार, पण कधीपासून?
जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी १० अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही १३ अंश इतकी होती. मात्र, यंदा ही सरासरी ३ अंशानी कमी झाली आहे. आता पारा ६ अंशावर आल्याने कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे.