मुंबई : राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान ३ ते ४ अंशांनी वाढल्याची माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात बदल झाला आहे. महाराष्ट्रात कोकण व विदर्भ वगळता नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यासह मराठवाड्यात ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. शनिवार व रविवारी विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा..
धावती रेल्वे पकडण्याच्या नादात तोल गेला अन्.. पाहा थरारक VIDEO
प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळ- पुणे एक्सप्रेस आजपासून तब्बल दाेन महिने रद्द
धक्कादायक! चाळीसगावच्या तरुणीवर सलग दोन दिवस केला बळजबरीने अत्याचार
10वी पाससाठी गुडन्यूज ! भारतीय डाक विभागात तब्बल 40889 पदांसाठी भरती, आताच अर्ज करा
मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीपासून वातावरण पूर्वपदावर येऊन किमान तापमानात घसरेल. यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.