धरणगाव : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असताना धरणगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर घडलीय. धरणगाव शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबविल्याची घटना घडली. सकाळी व्यापारी दुकान उघडत होता. दुकानाचे शटर उघडून दुसरे शटर उघडत असतांना ही घटना घडली. सकाळच्या वेळी भरदिवसा घडलेल्या या घटनेने धरणगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरटे हे दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गौरव डेडीया यांचे अनिल कुमार अँड हेमराज कंपनी नावाने किराणा दुकान आहे. ते होलसेलचे व्यापारी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुंजन डेडिया हे त्यांचे दुकान उघडण्यासाठी आले होते. गुंजन डेडीया यांनी दुकानाचे एका बाजूचे शटर उघडून जवळ असलेली पावणे सात लाखांची रोकडची पिशवी शटर उघडलेल्या दुकानात ठेवली. यानंतर त्याच दुकानाचे समोरील शटर उघडण्यासाठी गेले.
हे पण वाचा..
बँकेपासून पोस्ट ऑफिसपर्यंत कुठे जास्त व्याज मिळतंय, इथे जाणून घ्या
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज; सातवा वेतन आयोग लागू होणार, पण कधीपासून?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 8000 हुन अधिक पदांची भरती, अर्ज करण्याची आजची लास्ट डेट
पहाटच्या शपथविधीवर फडणवीसांच्या खळबळजनक दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणले वाचा..
सीसीटीव्हीमध्ये झाले कैद
याच दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी संधी साधत पावणे सात लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी घेऊन दुचाकीवर पोबारा केला. दरम्यान चोरटे हे दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. चोरट्यांनी डेडीया यांच्यावर पाळत ठेवली असावी, तसेच व्यापारी गौरव डेडीया यांच्या परिचितांमधील कुणीतरी रोकडबाबत टीप दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.