मुंबई : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. आता अशातच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
एका १४ वर्षीय मुलीवर काका आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून अत्याचार करण्यात आला आहे. तीन वर्षांनंतर या घटनेचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय काका आणि त्यांच्या १९ वर्षीय मुलाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी पीडिता गणपत पाटील नगर, बोरिवली येथे आपल्या मावशीच्या घरी गेली होती. यावेळी घरी कोणी नसताना काका आणि तिच्या भावाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरी कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पीडिता खूप घाबरली होती. आपल्या घरी परतल्यावर या बाबत तिने घरी काहीही सांगितले नाही. मात्र तीन वर्षांनी या बाबत पीडितेच्या कुटुंबियांना माहिती मिळाली. त्यांनी शनिवारी तात्काळ एम एच बी कॉलनी पोलीस स्टेशन गाठलं. घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा..
Big Breaking ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर ; नवे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती?
नोकरीत बढतीचे योग, थांबलेली कामे पूर्ण होतील ; आज काय म्हणते तुमची राशी?
पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती
तसेच काका आणि त्यांच्या मुलाला अटक केली आहे. यात काकांचा आणखी एक अल्पवयीन मुलगा देखील सामील असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.