पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळत असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर मोकाट कुत्रे हल्ला चढवत आहे. याच दरम्यान, शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून सोसायटी बाहेरील अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सोसायटीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अनिरुद्ध जोंधळे (वय ५ वर्ष) असं गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. सोसायटीबाहेर अनिरुद्ध खेळ असताना, कुत्र्यांच्या कळपाने त्याला घेरले आणि त्याचे लचके तोडले. दरम्यान, अनिरुद्धचा आक्रोश ऐकून सोसायटीमधील नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची वेळीच सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेत अनिरुद्ध गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (Viral Video) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे फ्लॅश
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ६ वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना#Pune #DogAttcks #Viral #Video #PuneNews pic.twitter.com/9mcsDDmMcC
— Satish Daud (@Satish_Daud) February 8, 2023
या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

