ठाणे : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसून अशातच ठाण्यातील दिवा पूर्वेकडील ओंकार नगर परिसरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६० वर्षीय विकृतानं ९ वर्षीय आणि ७ वर्षीय सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी वृद्धाविरोधात तक्रार दाखल केली असून संशयित नराधमाला तात्काळ अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील दिवा पूर्व येथील ओंकार नगर परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपी ६० वर्षीय व्यक्ती ही पीडित मुलींच्या शेजारी राहते. या ६० वर्षीय नराधमाने या दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलावले. याच संधीचा गैरफायदा घेत या नराधमाने ९ वर्षीय चिमुकलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली.
हे पण वाचा..
पवन एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्… घटनेचा थरार VIDEO समोर
धक्कादायक ! पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; शिंदे सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा
हा विकृत नराधम एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चिमुकलीला व्हिडिओमधील दृश्य दाखवून तशीच कृती करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या ७ वर्षीय चिमुकल्या बहिणीशीही अश्लिल चाळे केले. आपल्यासोबत वारंवार घडत असलेला प्रकार मुलींनी आईला सांगितला. त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी वृद्धाविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या विकृत नराधमाविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.