नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बुधवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी जाहीर केल्या. तसेच यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचत सन्मान पत्र महिलांसाठी आणले जाईल, ज्यामध्ये महिलांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
७.५ टक्के व्याज मिळेल
सरकारने म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर 2 लाख रुपये जमा करता येतील. यामध्ये देशभरातील महिलांना ७.५ टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे.