अकोला : राज्यात महिलांसह अल्पवयीन होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आलीय. एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याची बाब पीडितेने आईजवळ कथन केली.
आईने पीडित मुलीसह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. यावरून तेल्हारा पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार तालुक्यात घडला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पीडितेने आईसह पोलिसांत धाव घेतली.
हे पण वाचा..
LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर, आता सिलिंडरसाठी मोजा इतके रुपये
राशीभविष्य 1 फेब्रुवारी: आज ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी
सावधान! ‘या’ 5 आजारांच्या रुग्णांनी चुकूनही वांगी खाऊ नयेत! अन्यथा..
आई कामाला गेल्यावर आरोपी बापाने घृणास्पद कृत्य केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हे नोंदवून आरोपीस अटक केली आहे. सपोनि ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला असून नराधम आरोपी बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नराधम बापाला कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी नागरीकांतून होत आहे.