नवी दिल्ली : आज अर्थसंकल्पाचा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान गॅस कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतींची घोषणा केली आहे.
देशातील सर्वात मोठी गॅस कंपनी इंडेनने गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले. गॅस कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला गॅसच्या किंमती जाहीर करतात. गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गॅस कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत 100 रुपयांची दरवाढ केली होती.
गेल्या वर्षभरात सिलिंडर १५३.५ रुपयांनी महागला
गेल्यावर्षी, 2022 मध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतींनी जनतेला हैराण केले होते. देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडाला होता. तर घराचे बजेट सांभाळताना सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती. गेल्या वर्षी घरगुती LPG सिलिंडरच्या भावात एकूण 153.5 रुपयांची वाढ झाली आहे.
हे पण वाचा..
राशीभविष्य 1 फेब्रुवारी: आज ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी
सावधान! ‘या’ 5 आजारांच्या रुग्णांनी चुकूनही वांगी खाऊ नयेत! अन्यथा..
सिलिंडर किती वेळा महाग झाला होता
2022 मध्ये मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. नंतर मे महिन्यात पुन्हा भावात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्याचवेळी मे महिन्यात दुसऱ्यांदा 3.50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये शेवटच्या वेळी दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
घरगुती सिलिंडरचे नवीन दर-
दिल्ली – रु. 1053
मुंबई – रु. 1052.5
कोलकाता – रु. 1079
चेन्नई – रु. 1068.5
व्यावसायिक सिलिंडरचे दर-
दिल्ली – रु. 1769
मुंबई – रु. 1721
कोलकाता – रु. 1870
चेन्नई – 1917 रु

