जळगाव,(प्रतिनिधी)- समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा फार महत्वाचा वर्ग आहे. त्यातही वकिलांचे महत्व तर वादातीत आहे. त्याने केवळ व्यक्तिगत हितासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी वकिली करायला हवी. त्यामुळे त्यांनी सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी एकसंघ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन लॉयर्स प्रोफेशनल असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. राजकुमार थोरात यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅरीस्टरीच्या सनदला १०० वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त प्रबुद्ध वकील संघाने पत्रकार भवन जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
या समारंभाचे उद्घाटन अॅड. राजेश झाल्टे यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. गणपतराव धुमाळे, अॅड. केतन ढाके, अॅड. गणेश सोनवणे, अॅड. एन.सी. कापडणे, अॅड. के. जहांगिर, अॅड. प्रशांत बाविस्कर आदी विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचलन अॅड. राजेश गवई यांनी केले. आभार अॅड. सुनिल सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, अॅड. सुनिल इंगळे, अॅड. दिपक सोनवणे, अभिजित लोखंडे, विशाल घोडेस्वार यांच्यासह प्रबुध्द वकील संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतले.