दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या प्रवासी विमानात एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक ज्येष्ठ व्यक्ती हवाईसुंदरीसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहे. यादरम्यान, विमानातील काही प्रवासी त्याला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानात ड्यूटीवर असलेल्या एका हवाईसुंदरीसोबत प्रवाशाने हुज्जत घातली. इतकंच नाही तर त्याने अर्वाच भाषेत हवाई सुंदरीला शिवीगाळही केली. विमानातील हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे.
#WATCH | "Unruly & inappropriate" behaviour by a passenger on the Delhi-Hyderabad SpiceJet flight at Delhi airport today
The passenger and & a co-passenger were deboarded and handed over to the security team at the airport pic.twitter.com/H090cPKjWV
— ANI (@ANI) January 23, 2023
दरम्यान, वाद घालणाऱ्या या प्रवाशाला आणि त्याच्या साथीदाराला सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.
विमान प्रवाशांनी हवाईसुंदरीसोबत हुज्जत घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने हवाईसुंदरीसोबत गैरवर्तणूक केली होती. तसेच एअर इंडिया विमानात एक मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता.