अमळनेर : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी तरूण शेतकऱ्याचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक कसे की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवारी १७ जानेवारी रेाजी सकाळी ७ वाजता जयवंत कोळी हा शेतात पाणी भरण्यासाठी जात होता. त्यावेळी समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येवून जयवंतला जोरदार धडक दिली. या अपघातात जयवंतच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
हे पण वाचा…
राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; आजच कोर्टात हजर राहणार, नेमकं काय आहे कारण?
आज शक्यतो प्रवास टाळा ; जाणून घ्या काय म्हणते तुमची राशी?
जुन्या पेन्शनसंदर्भात मोठी बातमी ! रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना, काय आहेत घ्या जाणून..
तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान मयत जयवंत कोळी यांच्या पत्नी यांनी आरोपींचे नावे पोलिसांसमोर स्पष्ट केली आहे. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.