मुंबई : राज्यात शिंदे सरकारला स्थापन होऊन चार आठवडे झाले. तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका केली जात आहे. अशातच बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या फोनची सध्या चर्चा सुरु आहे.
वन्य प्राणी शेतात करत असलेल्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या संभषणाची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. उद्धवराजे नागरे असं असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरील संवाद ..
शेतकरी – आमच्या बायगाव बुजरुक, बेंडगाव, अंढेरा धोत्रा, निलगायी भरपूर आहेत. शेतात नुकसान आहे, शेताचं नुस्कान करतात,..
मुख्यमंत्री – काय झाल?
शेतकरी – शेताचं नुस्कान करते नुस्कान..
मुख्यमंत्री – शेताचं नुकसान होतंय निलगायीमुळे?
शेतकरी – हा हा…
मुख्यमंत्री – अच्छा.. कुठला एरिया..देऊळगावराजा तालुक्यामधील बेंडगाव, बायगाव
मुख्यमंत्री – बेळगाव
एक मिनिट एक मिनिट..घ्या
अधिकारी – हॅलो हा सांगा आपला कुठला भाग आहे
शेतकरी – बेंडगाव, बायगाव अंढे रा, धोत्रा, शेताचं खूप मोठं नुकसान होतंय साहेबाला सांगा..
अधिकारी – आपल्या तक्रारीची नोंद घेतलीय आम्ही कलेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती देत आहोत
शेतकरी – बरं बरं