मुंबई : जगातील अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. शेजारील देशातील लोक धान्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत भारतातही आर्थिक मंदी येऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. भारत सरकार याबाबत काय विचार करत आहे आणि अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणती योजना तयार करत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक मंदीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या तयारीची माहिती दिली.
जागतिक आर्थिक मंदीचा नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रातील पुणे शहरात G20 च्या पहिल्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आर्थिक मंदीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताच्या तयारीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “आम्ही मंत्रिमंडळात असल्यामुळे आम्हाला माहिती मिळते (आर्थिक मंदीबद्दल) किंवा पंतप्रधान मोदीजी आम्हाला त्याबद्दल सुचवतात.”‘ ते म्हणाले की, सध्या मोठे विकसित देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.” रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यात येत असल्याचेही राणे म्हणाले.
हे पण वाचा..
वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना
महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?