जळगाव : पत्नी मुलांसह घरात गाढ झोपेत असताना पतीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. पतीने मध्यरात्री गळफास घेत जीवन संपवले आहे. मुकेश वासुदेव अहिरे वय ३६ असे मयत तरूणाचे नाव असून या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्याम, मुकेशने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश अहिरे हा तरूण पत्नी व मुलांसह राहत होता. एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी मध्यरात्री पत्नी आणि मुलं झोपलेले असताना मुकेश याने घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.
हे पण वाचा
अर्थसंकल्पात सरकार करू शकते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, हप्त्याची रक्कम 6000 वरून 8000 होणार?
अल्पवयीन मुलावर 28 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार ; जळगावातील संतापजनक घटना
आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून
अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार
शनिवारी सकाळी ७ वाजता पत्नीला जाग आल्यावर तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर तिने एकच आक्रोश केला. घराजवळ राहणा-या नातेवाईकांना बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मुकेश यांना मृत घोषित केले. दरम्याम, मुकेशने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये.याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.