जळगाव : पहिल्या पत्नीपासून तरुणाला ६ अपत्यं झालेली, तरी तरुणाने पीडित तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप आहे. चोपडा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या पाच वर्षांच्या काळात पीडितेलाही तीन मुलं झाली. न्यायालयाच्या आदेशाने चोपडा ग्रामीण पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावातील 29 तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने 2016 ते 2021 पर्यंत अत्याचार केला व या पाच वर्षाच्या काळात पीडीतेला तीन मुले झालीत. मात्र आरोपीचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यास पहिल्या पत्नीपासून सहा अपत्ये झाल्याचे लक्षात आल्याने आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याचा आरोप पिडीतेने करीत न्यायालयात धाव घेतली.
हे पण वाचा..
.. तर शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा विचार करू ; प्रकाश आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट
भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत WHO ने दिला ‘हा’ इशारा
राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार
विशेष म्हणजे घरातील सदस्यांनी पिडीतेस घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याने पीडीतेच्या तक्रारीवरून ७ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये चोपडा ग्रामीण रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.