पाचोरा (प्रतिनिधी) -पाचोऱ्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
मराठा समाजा बद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकार ने मराठा आरक्षणवर मौन आहे हे मौन तोडुन मराठा समाजाला आरक्षण चा प्रश्न मार्गी लावा, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षकच होते अशी मागणी केली यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष जिभाउ पाटील, पी. डी. भोसले, बाळु पाटील, संजय मुळे, मनोज पाटील, हेमंत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते