जळगाव : लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार पित्याला भरधाव ट्रकने जळगाव (Jalgaon) तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ चिरडल्याची दुदैवी घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी घडली
एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू दीपक कोळी (वय ४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे राजू कोळी कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीकाम करून उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी दुचाकीने जळगावहून निघाले.
हे पण वाचाच..
रेशन कार्डधारकांनो इकडे लक्ष द्या! सरकारने आजपासून मोफत रेशन योजनेत केला हा मोठा बदल
महागाईचा झटका ! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये
10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर.. रेल्वेत ४१०३ जागांसाठी नवीन भरती
दुपारी साडेबाराच्या सुमारास शिरसोली गावापुढील रामदेववाडी गावाजवळच समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.