नवी दिल्ली : देशात महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या थांबतच नाहीय. अशातच आता चारचाकीमधील तरुणीला बळजबरीने झुडपात घेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हे घटना उत्तर प्रदेशच्या यमुनावर महामार्गावर उघडकीस आलीय. तरुणी नोएडावरून फिरोजाबादला जात होती, त्यावेळी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी नोएडाच्या सेक्टर ३७ मधून रात्री साडे आठ वाजणाच्या सुमारास फिरोजाबादला जाण्यासाठी शेअर टॅक्सीमध्ये बसली. टॅक्सी यमुना महामार्गावर आल्यानंतर सोबतचे प्रवासी तरुणीसोबत गैरवर्तवणूक करू लागले.
आग्रा येथील कुबरेपूर भागात रात्री १ वाजण्याच्या सुमारास चारचाकीमधील तरुणीला बळजबरीने झुडपात घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी तरुणीसोबत पहाटे ४ वाजेपर्यंत आळीपाळीने अत्याचार केला. पीडित तरुणी रडत रडत लोकांना मदतीसाठी याचना करत होती. मात्र, थंडी आणि धुक्यामुळे लोकांनी तिचा आवाज ऐकू गेला नाही. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला रिक्षात बसवून फिरोजाबादला पाठवून दिले.दरम्यान, तरुणी एत्मादपूरमध्ये रिक्षातून उतरून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकात पोहोचली. पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सर्व माहिती ऐकून घेतली. त्यानंतर महामार्गाच्या टोलवरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन आरोपींचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे
हे देखील वाचा..
महावितरणकडून ग्राहकांसाठी आली गुडन्युज ; वाचून तुम्हीही खुश व्हाल..
रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता वेगळ्या पद्धतीने तिकीट बुक होणार, सरकारने जारी केला आदेश
कारने दुचाकीस्वासह दोन शाळकरी मुलींना उडवलं; काळजाचा ठोका चुकवणारा Video समोर
पोलीस आयुक्त डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा या प्रकरणी आणखी विचारपूस सुरू आहे. या प्रकरणात आणखी खुलासे आल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’.
दरम्यान, या घटनेनंतर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.