नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मंत्री पदावरून शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल करत असतांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची चांगलीच फिरकी घेतली.
अजित पवार वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत होते, मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून नाराजी व्यक्त करत होते, त्याचवेळी मुख्यमंत्री पद हे राज्यातील सर्व विभागाला मिळाले आहे, पण उत्तर महाराष्ट्राला मिळाले नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत व्यक्त करत असतांना गिरीश महाजन यांच्या नाव सभागृहात सदस्यांनी घेतले.त्यावेळी अजित पवार यांनी गिरीश महाजन यांची चांगलीच फिरकी घेतली, अजित पवार म्हणाले गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद नाही तर मोठी जबाबदारी द्यायची ठरलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे, त्यांचा संपर्क तसा आहे, युनायटेड नेशनची जबाबदारी महाजन यांना देऊ म्हणून पवार यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. अजित पवार यांनी यावेळी गिरीश महाजन यांचे फार कॉटॅक्ट आहे ते झटपट कॉट्रॅक्ट करतात असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.