सोलापूर,(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर येत असतांना महाराष्ट्राला हदरावून टाकणारी घटना समोर आली आहे… ही घटना एकूण तुम्हालाही धक्काचं बसेल… एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे पोट दुखू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी तिला डॉक्टरांना दाखवले असतात तपासणी नंतर डॉक्टरांचा रिपोर्ट पाहून घरच्यांना धक्काच बसला. १४ वर्षीय मुलीच्या मावशीचे पती नात्याने मावसा लागतं असलेल्या व्यक्तीने त्या पीडितेवर सतत अत्याचार केल्याने ती २४ आठवडे १ दिवसाची गर्भवती राहिल्याचे समोर आले.
रुग्णालयातील तपासणी व हाती आलेल्या रिपोर्ट नंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली, त्यावेळी मावशीच्या नवऱ्यानेचं वेळोवेळी अत्याचार केल्याचे तिने पालकांना सांगितले. मावसाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचे वय लहान आहे व मुलाला जन्म देण्यासाठी ती सक्षम नसल्याने तिचा गर्भपात करण्यासाठी पालकांनी तेथील डॉक्टरांना गर्भपात करण्याची विनंती केली. पण, त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मदत घेत न्यायालयात धाव घेतली.
पीडित मुलीच्या पालकांनी विधी सेवा प्राधिकरणाकडे मदत मागितली त्या नुसार गर्भपाताला परवानगी मिळावी म्हणून विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला मदत केली आणि शनिवारी दिनांक २४ रोजी पीडितेला उच्च न्यायालयातून गर्भपाताला परवानगी सुद्धा मिळाली आहे. ॲड. सलोनी घुले यांनी पीडितेची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर सुनावणी होऊन २४ डिसेंबर रोजी पीडितेला न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिली आहे.