जामनेर : जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. मात्र यादरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आलीय. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर वाद उफाळून आला. दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी, वय 32 असे मृत ग्रामस्थाचे नाव असून या प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकळी खुर्द गावात दोन्ही पॅनल भाजपच्या कार्यकर्त्यांचे होते. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत धनराज माळी यांचा भाऊ जितेंद्र माळी हा सरपंचपदासाठी उभा होता. मात्र या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर एका पॅनलचा विजय दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना पराभव जिव्हारी लागला.
हे पण वाचा..
ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे देते ‘ही’ मोफत सुविधा.. तुम्हाला आहे का माहिती? नसेल तर जाणून घ्या आताच??
गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याच्या मुलीच्या पॅनलचा जळगावात पराभव
महाराष्ट्र हादरला ! घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार
थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी
गावात गेल्यानंतर विजयी उमेदवार दर्शनासाठी मंदिरावर जात असताना वाद उफाळून आला. घरांवरुन दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दगड लागून धनराज माळी या ग्रामस्थाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरु केली आहे.