तुम्हीही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. MahaForest Bharti वनरक्षक जिल्ह्यानुसार जागा वनरक्षक पदाच्या खाली दिलेल्या जागा सर्व ह्या अंदाजे आहेत. या जागांचा अधिकृत शासन निर्णय (GR) येणे बाकी आहे. MPSC क्षेत्रात विश्वासनीय असणाऱ्या सोशल मीडिया हँडल वरून या जागा घेण्यात आलेल्या आहेत.. जिल्हा आणि अंदाजित रिक्त जागा : चंद्रपुर -116 गडचिरोली -233 अमरावती- 252 यवतमाळ-107 औरंगाबाद -109 धुळे – 244 नाशिक – 90 पुणे – 82 ठाणे -384 कोल्हापूर – 220 हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोगातर्फे तब्बल 4500 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी… मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे विविध पदांसाठी भरती ; १२ वी पाससाठी उत्तम संधी… बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. तब्बल 551 जागांसाठी होणार भरती 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बंपर भरती, आताच अर्ज करा पूर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची १००% पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरीता राखीव होती. मा. राज्यपाल यांचेकडील अधिसूचना दि. २९/८/२०१९ अन्वये पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार १००%, ५०% व २५% याप्रमाणे राखीव करण्यात आली आहे. सदर अधिसूचना वनविभागात कशाप्रकारे अंमलात आणावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रातील वनरक्षक पदांबाबत वेगळ्याने सुचना निर्गमित करण्यात येतील. वनरक्षक भरती प्रक्रिया ही महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २८/८/२०१८ अन्वये ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार राबवावयाची आहे. त्यानुसार बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीकरीता वरीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम राबवून प्रक्रिया पूर्ण करावी.