मुंबई : आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्या-चांदीचे दर स्थिर राहिले. सोन्या-चांदीच्या दरात फारसा बदल झालेला नाही. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या भावात सकाळी 0.31 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी, वायदा बाजारात आज चांदीच्या दरात 0.15 टक्क्यांची किंचित वाढ दिसून आली. जागतिक बाजारात सोन्या-चांदीत मजबूती आहे.
1 डिसेंबर रोजी MCX गोल्ड फेब्रुवारी फ्युचर्स 53,893 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर, एमसीएक्स सिल्व्हर मार्च फ्युचर्स 65,409 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
दिल्ली-मुंबईत आज सोन्याचा दर किती आहे
आज मुंबई, हैदराबाद, केरळसह काही शहरांमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,250 रुपये आहे. आदल्या दिवशी किंमत 48,750 होती. म्हणजेच, दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आदल्या दिवशी 53,180 होता. त्याचवेळी दिल्ली, मुंबई, दिल्ली आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये चांदीचा भाव 64,000 रुपये प्रति किलो आहे.
हे पण वाचा..
डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय आहे योजना?
दोन विद्यार्थ्यांकडून वर्गातच विद्यार्थिनीवर आळीपाळीने अत्याचार, मुंबईतील घटना
आता महाराष्ट्राच्या मातीतून निघणार सोनं, ‘या’ दोन ठिकाणी सापडल्या खाणी
ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार रेल्वे तिकिटात सवलत, पण.. ; जाणून घ्या सरकारची नवीन योजना
सोने अजूनही विक्रमी उच्चांकापेक्षा स्वस्त आहे
भारतात गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 5% म्हणजेच 2,500 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली होती. पण, तरीही सोने विक्रमी पातळीवरून 3000 रुपयांनी स्वस्त होत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.