यावेळी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेली माहिती अशी की, पुंडलिक नथ्थु चौधरी रा. उदळी खुर्द ता. रावेर जि. जळगाव,नंदकुमार मुकुंदा पाटील रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव, सुदाम तुकाराम राणे रा. सावदा, ता. रावेर, जि.जळगाव,मुरलीधर सुदाम राणे रा. सावदा, ता. रावेर, जि.जळगाव,सदाशिव पुरूषोत्तम चौधरी रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव,सुधाकर मुकुंदा पाटील रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव (सर्व गैरअर्जदार)
व अर्जदार शेतकरी १)पुंडलिक नथ्थु चौधरी रा.उदळी खुर्द ता. रावेर जि.जळगाव, २) रमेश भास्कर पाटील रा.हंबर्डी, ता. यावल जि. जळगाव,३)रमेश लक्ष्मण चौधरी रा. अट्रावल, ता. यावल जि.जळगाव आणि निलेश रमेश चौधरी रा. अट्रावल, ता. यावल जि. जळगाव ४) सुरेशचंद्र पाव्हणू फेगडे व २. चंद्रकुमार सुरेश फेगडे रा. उदळी खु. ता. रावेर, जि. जळगाव ५) निलेश धनसिंग पाटील, रा. दुसखेडा, ता. यावल जि. जळगाव६)रतिराम देवचंद पाटील(मयत) रा. कोचुर., ता. रावेर, जि. जळगाव ७)सुनिल अर्जुन जावळे, रा. कुसुंबे, ता रावेरजि.जळगाव ८)श्रीमती उषाबाई टोपा जंगले, रा. कुंभारखेडा, ता रावेरजि जळगाव ९)मंदाबाई मनोहर पाटील(मयत) रा. कुंभारखेडा ता. रावेरजि. जळगाव १०)श्रीमती भारती अनिल परदेशी, रा. कोचुर बु. ता. रावेर,जि. जळगाव ११) लक्ष्मण बुधो ढिवर (सुरळके) रा. उदळी बु., ता. रावेर, जि.जळगाव १२)सोपान शामराव पाटील, रा. उदळी बु., ता. रावेर,जि. जळगाव,१३) ज्ञानदेव देवराम महाजन, रां. उदळी खु. ता. रावेर, जि जळगाव,१४)श्रीकृष्ण दामू पाटील,रां. उदळी बु.. ता. रावेर, जि जळगाव,१५)रवींद्र भागवत जावळे, रां. फैजपूर, ता. यावल जि. जळगाव यांच्यात झालेला शेती विक्रीचा नोंदीकृत व्यवहार झालेला दिसून येतं असून गैरअर्जदार ६ जणांचा सावकारी व्यवसाय आहे.
गैरअर्जदार व अर्जदार १५ शेतकरी यांच्यात झालेला व्यवहार हा सावकारीच्या अनुषंगाने झालेला असल्याचे वेळोवेळी झालेल्या ४७ सुनावणी दरम्यान दाखल दस्ताऐवज, खरेदी खत, साक्षीदारांचे पुरावयाचे प्रतिज्ञालेख, घर झाडतीबाबतचा अहवाल, न्यायालयीन प्रकरणातील दस्ताएवजांच्या प्रति यावरून स्पष्ट होतं असल्याने सावकारीच्या ओघातून झालेल्या नोंदणीकृत दस्ताऐवजा बाबतच्या महसूल नोंदी अवैध घोषित करून रद्द करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितलं.
एकूण १५ प्रकरणात एकूण ३८ हे ३७.५८८ आर शेतजमीन व १५८.६३ चो मी. प्लॉट परते करणेचे आदेश पारीत केले आहेत. तसेच तिन गैरअर्जदार यांचेवर रक्कम रु.१,८५,३५,०००/- निश्चित करणेत आले असुन सदर निश्चित केलेले मुल्य महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ कलम १७(५) मधील तरतुदीनुसार गैरअर्जदार क्रं. ३ श्री. मुरलीधर काशिनाथ राणे यांनी एकूण रु.९०,५८,०००/- (अक्षरी रुपये नव्वद लाख अठ्ठावन्न हजार मात्र), गैरअर्जदार क्रं. १ श्री.नंदकुमार मुकुंदा पाटील यांनी एकूण रु.८१.९७,०००/- (अक्षरी रुपये एक्याऐंशी लाख सत्याणव हजार मात्र) तसेच गैरअर्जदार क्रं. ७ श्री.दिलीप सुखदेव पाटील यांनी एकूण रु.१२,८०,०००/- (अक्षरी रुपये बारा लाख पस्तीस हजार मात्र) अर्जदार श्री. रविंद्र भागवत जावळे यांना देणेची कार्यवाही करावी असे आदेशात नमूद आहेत.
आदेश मिळताच शेतकऱ्यांना अश्रू अनावर….
सावकारीच्या कचाटीत अडकलेल्या जमिनी मिळवणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु होता आज अखेर सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करण्याचे आदेश दिले व त्याच्या प्रति या शेतकऱ्यांना दिल्या त्यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी संतोष बिडवई मनापासून आभार मानले यावेळी संतोष बिडवई यांच्याही डोळ्यात पाणी आले. शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.