नवी दिल्ली : जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपतींची नावे असू शकतात, परंतु 2022 मध्ये हजारो करोडपतींनी देश सोडला आहे. Henley & Partners च्या अहवालानुसार, एका वर्षात 8 हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला आहे. या आकडेवारीसह भारत आता श्रीमंतांच्या स्थलांतराच्या बाबतीत टॉप-3 देशांमध्ये सामील झाला आहे. देशात राहून कमाई करणाऱ्या उद्योगपतींवर अखेर देश सोडण्याची वेळ का आली. अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वलय असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने भारतीय श्रीमंतांचा देशाबद्दल भ्रमनिरास झालेला दिसतो. आकडेवारी सांगते की 2022 मध्येच हजारो करोडपतींनी भारताला Goodby केले आहे. हेन्ले अँड पार्टनर्सने आपल्या अहवालात याबाबत खुलासा केला आहे. यानुसार, भारताचा समावेश जगातील त्या तीन देशांमध्ये झाला आहे, जिथे कोट्यधीशांचे सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
8 हजार कोट्यधीश स्थलांतरित
बिझनेस इनसाइडरवर प्रसिद्ध झालेला हेन्ली अँड पार्टनर्सचा अहवाल पाहता, भारतासह अनेक देशांतील श्रीमंत लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2022 मध्ये 8,000 करोडपती भारतातून स्थलांतरित झाले आहेत. या प्रकरणात आघाडीवर असलेल्या रशियातून स्थलांतरित झालेल्या लक्षाधीशांची संख्या यंदा 15,000 झाली आहे, तर या काळात चीनमधून 10,000 लक्षाधीशांनी स्थलांतर केले आहे.
या कारणांमुळं सोडला देश
भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचं कारण या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालानुसार, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सगळ्यात मोठं कारण आहे. अन्य कारणांचा विचार केल्यास श्रीमंत लोकं आर्थिकदुष्ट्या मजबूत होण्यासाठी दुसऱ्या देशात स्थायिक होतात. त्याचबरोबर, आरोग्य, शिक्षण आणि उत्तम लाइफस्टाइलसारख्या सुविधा तसंच, अपराधांची संख्या हे सुद्धा एक कारण आहे.