जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. खंडपीठाने सुरेश जैन यांचा आज अखेर जामीन मंजूर केला आहे. सुरेशदादा जैन यांना जामीन मिळताच दादा प्रेमी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जळगावात जल्लोष करण्यात आला.
घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह इतरांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा..
Digital Rupee : आता रोख पैशांची गरज संपणार! जाणून घ्या कसा कराल वापर
Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या…
खबरदार पुरुषांनो! आता महिलांकडे 14 सेकंद पाहिल्यास होणार तुरुंगवास
Mantralaya News ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय !
आईच्या कष्टाचं पोरानं केलं चीज; MPSC परीक्षेत हर्षलची भरारी
दुध संघ निवडणूक ; आ. किशोरअप्पा पाटील यांच्या ‘खेळी’ ने सर्वानाचं आश्चर्याचा धक्का!
तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता.माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, आज सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.