जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) :- रावेर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती निमित्ताने आठवडे बाजार परिसरात रथ उत्सव व मिरवणूक आणि आतिषबाजीचा कार्यक्रम असतो रावेर तालुक्यातुन व आसपासच्या ग्रामीण भागातुन मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी असते.
रावेर येथील रथ उत्सव व मिरवणुक आणि आतिषबाजीचा पारंपारिक नियोजीत कार्यक्रम सोहळा हा आठवडे बाजार परिसर, रावेर येथे होणार आहे. सदर कार्यक्रम गुरुवार, शुक्रवार, शनिवार दिनांक 8,9,10 डिसेंबर या तीन दिवस चालणार आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता सदर कार्यक्रम सोहळयाचे ठिकाण आणि दर शुक्रवारी रावेर येथील आठवडे बाजाराचे ठिकाण हे एकच आहे. तसेच सदर कार्यक्रम हा गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवस सलग असल्याने नियमित बाजाराचा दिवस वगळून सोईच्या दिवशी भरवण्यात यावा असे जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल जळगाव , यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.