आतापर्यंत आपल्या mutual fund खात्यातील पैसे काढल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी गुंतवणूकदारांना १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता ७ दिवसांनी कमी करत ३ दिवसांवर आणण्यात आला आहे.mutual fund मध्ये केलेल्या गुंतवणुकीचे पैसे काढायचे असल्यास आता ते ३ दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करावेत असे निर्देश भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने जारी केले आहेत.यामुळे गुंतवणूक धारकांना आपल्या पैशांसाठी १० दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार नाही हे महत्वाचे.
या बरोबर mutual fund योजनेतर्फे जो बोनस दिला जातो, तो देखील गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये अथवा पुनर्गुतवणुकीमध्ये करण्याची कार्यवाही सात दिवसांत करावी, असेही सेबीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी बोनस जमा होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत होता, हा देखील बदल आता करण्यात आला आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी एवढं करा…
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर प्रथम तुम्हाला हे ठरवावं लागेल की गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे, किती काळासाठी आणि किती गुंतवणूक करायची आहे. या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. विशेषत: तुम्हाला किती काळ गुंतवणूक करायची आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण म्युच्युअल फंड वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे असतात. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी डेट फंड किंवा लिक्विड फंड निवडू शकतात. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंड इतरांपेक्षा सर्वोत्तम असतील.
जर तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड केली असेल तर ज्या कंपनीनं ही योजना आणली आहे, त्यांचा रेकॉर्ड नक्की पहा. यासोबतच कंपनीच्या व्यवस्थापकाचे रेकॉर्डही तपासणं आवश्यक आहे. अशी माहिती कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे कोणत्याही फंडाची कामगिरी, रेटिंग, पोर्टफोलिओ याबद्दल माहिती उपलब्ध असते, त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनचं आपण गुंतवणूक करायला हवी.म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक जोखमीची असते त्यामुळे आपण सर्व माहिती घेतल्यावर गुंतवणूक करणे योग्य राहते.