रत्नागिरी,(प्रतिनिधी) – महिलेसोबत मोबाईलवर Video call वर बोलणं महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या असून अनेक जण या जाळ्यात अडकल्याचे दिसून येतं असतांना नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातून एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मोबाइलवर Video call करून एका महिलेने तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत उघडकीला आला आहे. हा Video viral करण्याची धमकी देत महिलेने तरुणाची ५० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात महिलेसह अन्य एकावर ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने स्वतः निर्वस्त्र होतं केला व्हिडीओ कॉल वर संवाद
याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉल दरम्यान स्वतः निर्वस्त्र होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले. तसेच पीडित तरुणालाही निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
थोड्याच वेळात पैशांसाठी फोन खणखणला….
त्या महिलेशी व्हिडीओ कॉल संभाषण संपल्यावर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तुझा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे सांगत तो यूट्यूबवर टाकतो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणाकडून पैसे मागण्यात आले.तरुणाकडून गुगल पेद्वारे ५०, ५०० रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली आली आहे.