हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांचा ‘Drishyam 2′ या शुक्रवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर 3 तीन दिवस पूर्ण केले सुसाट वेगाने कमाई देखील केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, परिणामी चित्रपटाच्या निर्मात्यांवर नोटांचा पाऊस पडत आहे. ‘Drishyam 2′ च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत यावरून चित्रपट हाऊसफुल सुरु असल्याचे दिसते.
Drishyam 2′ – 2022 news
‘Drishyam 2‘ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली. यासोबतच Ajay Devgan चा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ नंतर बॉलिवूडचा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कलेक्शन करताना 21.59 कोटींची कमाई केली होती. दोन दिवसांत ‘ ‘Drishyam 2′ ने 36 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने आणखी दमदार कामगिरी केली.
बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टिंग वेबसाइट नुसार, ‘ ‘Drishyam 2′ ने तिसऱ्या दिवशी जवळपास 26.70 कोटींचा व्यवसाय केला (आकडे सुरुवातीचे आहेत आणि बदलू शकतात). यासह वीकेंडला त्याचे एकूण कलेक्शन 63 कोटींहून अधिक झाले आहे. याआधी हा चित्रपट ४५ ते ५० कोटींचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा होती. सर्व अंदाजांना मागे टाकून त्याने बंपर व्यवसाय केला.