जळगाव : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेते-कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. याच दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील हे आपल्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा एकमेकांवर टीका केली. मात्र पत्राचाळ कथित घोटाळ्या प्रकरणी जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा गुलाबराव पाटील यांनी बहुतांश सभेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. एका सभेत तर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर फिल्मीस्टाईल टीका केली होती. मात्र आता संजय राऊत यांच्या सुटकेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा..
संतापजनक ! 25 वर्षीय नराधमाचा दीड वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…
12वी पाससाठी महाराष्ट्र पोलीस खात्यात बंपर भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु
मग मानहानीचा दावा कशासाठी? 50 खोक्यावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी
त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर दिली आहे.तसेच पुण्याच्या राष्ट्र्वादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तुमच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे, त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की, यावर ते ध चा म करण्यात आघाडीवर आहेत, आणि आमची महिला आघाडी यावर रुपाली पाटील यांना उत्तर देणार आहे मी नाही.