जळगाव : शिंदे आणि फडणवीस सरकार कोसळणार असलयाचे भाकीत राज्यातील विरोधक नेत्यांकडून वर्तविला जात आहे. याच या पार्श्वभूमीवर केव्हाही विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी त्यांनी राज्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. दरम्यान मुंबईच्या सेना भवनात सोमवारी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठक घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जळगाव शिवसैनिकांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता सर्वस्वी न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. या मतदार संघासाठी उमेदवार शोधण्याच्याही सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा..
राज्यात ‘या’ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..
Jalgaon news ; जळगावकरांना ‘या’ वेळेला पाहता येणार ‘खंडग्रास चंद्रग्रहण’
अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय का? नसेल तर आताच जाणून घ्या
जळगाव लोकसभा मतदार संघातून 6 हजार निष्ठावंत शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे पाठवण्यात आलेली होती. त्यापैकी 5 हजार 827 प्रतिज्ञापत्रे स्विकारण्यात आल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुखांनी केलेल्या सक्रीय सदस्य नोंदणीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी 2 हजार 827 सक्रीय सदस्य केले तर हर्षल माने यांनी ३ हजार सक्रीय सदस्य केल्याची माहिती दिली. जळगावमधील सक्रीय सदस्य नोंदणी ही मनपाला पुरेल एवढीही नाही. किमान 7 हजार सक्रीय सदस्य नोंदणी पक्षनेतृत्वाला अपेक्षीत होती. पक्षातील कुरघोडीचे राजकारण, उणेदुणे काढणे बंद करुन संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत.