ठाणे : राज्यात काही केलं तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशात घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधमाने ५ वर्षाच्या चिमुरडीवर अतिशय भयंकर पद्धतीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा भागात हा प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नराधमाची कुटुंबासोबत जवळीक होती. तो वारंवार त्यांच्या घरात ये-जा करायचा. याचाच फायदा घेत नराधमाने चिमुरडीवर अतिप्रसंग ओढावला. पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितल्यानुसार, आरोपी हा मजुरीचे काम करायचा आणि इतर ५ सहकाऱ्यांसोबत पीडित मुलीच्या घरापासून २० मीटर अंतरावर एका खोलीत राहायचा. तर टॅक्सी चालक म्हणून काम करणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी नराधमाला नोकरीच्या शोधात मुंबईत आल्यापासून अनेकवेळा मदत केल्याने पीडितेच्या आई-वडिलांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे ते कामानिमित्त बाहेरगावी जरी गेले तरी आरोपी चिमुरडीची काळजी घ्यायचा.
हे पण वाचा :
आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांनी संयम ठेवा, लवकरच चांगले परिणाम मिळतील
अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार, भुसावळमधील धक्कादायक घटना
बाप रे बाप! महिला रस्त्याच्या मधोमध थांबली, समोरून बाईक येत होती आणि मग…, पाहा थरारक Video
एक दिवस नराधमाने आई झोपली असल्याचा फायदा घेत तिला फिरण्यासाठी घनदाट जंगलात नेले. पण तिथे लोकांनी त्याला ओरडल्याने तो काही करू शकला नाही. यानंतर तो तिला मुलांच्या खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. सगळ्यात भयंकर म्हणजे या नराधमाने बलात्कार करून तिला एकटे सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
आई उठल्यानंतर पीडितेचा शोध घेत असता तिला रडण्याचा आवाज आला आणि तिने खोलीत धाव घेतली. यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे आईला आढळून आले. त्यांनी तातडीने रुग्णालय गाठले असता तिच्यावर बळजबरीने बलात्कार झाला असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या घटनेचा सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.