भडगाव,(प्रतिनिधी)- प्रेम प्रकरनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे…तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुमच्या घरासमोर आत्महत्या करेन…थेट अशी धमकीच मुलीने मुलाच्या नातेवाईकांना दिल्याची घटना भडगाव तालुक्यात घडली आहे. धमकी देणाऱ्या मुली विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार एका मुलीचे तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहेत. तरूणा सोबत माझे लग्न करून द्या असे सांगून तरूणाच्या आई व वहिनीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तरूणीने दिला आहे.हा प्रकार भडगाव तालुक्यातील एका गावातील आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावातील तरूणी हिचे एका तरूणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरूणाशी लावून द्या अशी मागणी करत तरूणाच्या घरात घसुन तरूणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ व माहराण केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही, नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन असा इशारा तरूणीने मुलाच्या नातेवाईकांना दिला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरूणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहे.