जळगाव,(प्रतिनिधी)- पत्रकारिता हे एक पवित्र क्षेत्र आहे. समाजाच्या कल्याणासाठी या क्षेत्राचा योग्य पद्धतीने वापर करावा, चांगले काम करीत राहणे आणि इतरांना चांगले करण्याची प्रेरणा देणे हे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख पत्रकारितेचा ध्यास धरावा असे मत विद्यानिकेतन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. बी. चौधरी यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील एम.ए.एम.सी.जे. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांतर्फे प्रथम वर्षातील तसेच पत्रकारिता पदविकेच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विचारमंचाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्य विद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. एच. शिंदे यांच्यासह पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्राचार्य चौधरी म्हणाले की, वृत्तपत्रांचे स्थान अनन्यसाधारण आहे. एक दिवसही वृत्तपत्र उशीराने घरी आले तरी अस्वस्थता निर्माण होते. या जनमाध्यमातून जगभरातील घडामोडी कळतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रसार माध्यमे माहितीचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे माध्यमेही ज्येष्ठ नागरिकांसाठी माहितीचे बहुमूल्य असे साधन आहे. अवतीभोवती चांगल्या किंवा वाईट घडणाज्या घटनांचे दर्शन माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले. पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. अनिल चिकाटे म्हणाले की, विद्यापीठीय शिक्षण हे संमृद्ध करणारे असते. विदयाथ्र्यांनी अध्ययनासोबत वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवन घडणीत गुरुंचे स्थान अतिशय महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सोमनाथ वडनेरे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय परमानंद साळवे यांनी करुन दिला.
सूत्रसंचालन दीक्षिता देशमुख आणि मिलींद देशमुख यांनी केले. आभार निशा अडकमोल यांनी मानले. या कार्यक्रमाला संरक्षणशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग, डॉ. सुभान जाधव, मानसशास्त्र विभागाच्या डॉ. विना महाजन, डॉ. अनिल तौर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, भिकन बनसोडे, महेश पाटील, तुषार महाजन, विकास पाटील, समाधान वाघ, परमानंद साळवे, आदिंनी परिश्रम घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला विद्याथ्र्यांचा सोहळा :
विद्याथ्र्यांच्या स्वागत समारंभ सोहळयात विद्याथ्र्यांनी नृत्य, कला, गायन, शेलापागोटे, यासह विविध कला गुण सादर केले. विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या कला गुणांनी सांस्कृतिक कार्यक्रम चांगलाच रंगला. उपस्थित विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या कला गुणांना मनमुरादपणे दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन समाधान वाघ यांनी केले. यावेळी प्रथम, द्वितीय व पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.